Ukhalu Waterfall : मे महिन्यातच कोसळू लागला 'उखळूचा धबधबा', फेसाळत्‍या पाण्याची पर्यटकांवर मोहिनी! File Photo
कोल्हापूर

Ukhalu Waterfall : मे महिन्यातच कोसळू लागला 'उखळूचा धबधबा', फेसाळत्‍या पाण्याची पर्यटकांवर मोहिनी!

गेल्‍या ५० वर्षात प्रथमच मे महिन्यात उखळूचा धबधबा प्रवाहित झाल्‍याने पर्यटकांसाठी पर्वणी

पुढारी वृत्तसेवा

The 'Ukhalu Waterfall' started flowing in May

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा

शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शेवटचे टोक असलेल्या चांदोलीधरणाच्या समकक्ष सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेले उखळू येथील धबधबा चालू वर्षा मे महिन्यातच कोसळू लागला आहे, गेल्या ५० वर्षात असे कधीच झाले नाही ते या वर्षी झाले असून पर्यटकांना एक पर्वणीच प्राप्त झाली आहे.

मान्सून पूर्व पावसाने गेल्या दहा दिवसांपासून शाहूवाडी तालुक्यात चांगलाच जोर धरला आहे. शाहूवाडीच्या उत्तर भागातील कानसा-वारणा खोऱ्यात तर पावसाचा आगरच असतो. चालू वर्षी पावसाने अनेक वर्षांची आकडेवारी मोडीत काढली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी जून महिन्यात प्रवाहित होणारे पाण्याचे प्रवाह मे महिन्यातच सुरू झाले आहेत.

सध्या तालुक्यात पाऊस कोसळत आहे. अशा वातावरणात चांदोली धरण परिसरातील शाहूवाडी तालुक्यात निसर्गसौदर्यात भर घालणारा उखळू येथील धबधबा मे महिन्यातच कोसळू लागला आहे. सह्याद्रीच्या पर्वत रागेत असणारा हा नयणरम्य धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांना एक नवी संधी प्राप्त झाली आहे.

साधारण २५० ते ३०० फूटांवरून हा धबधबा कोसळत असतो. प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून पुढचे चार महिने या भागात पर्यटकांचा ओग असतो, या ठिकाणी शाहूवाडी शिराळा, इस्लामपूर, कराड या भागातून हौशी पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT