

मिणचे खुर्द : मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूस अस्तरीकरण झालेला कालवा पुन्हा मंगळवारी फुटल्याने कालवा प्रशासनाच्या कामाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. निकृष्ट कामामुळे दूधगंगा कालव्यास वारंवार भगदाड पडत असल्याने शेतकरी वर्गातून तीव— संताप व्यक्त होत आहे. पाटबंधारे, जलसंपदा विभागाच्या व ठेकेदाराच्या दुर्लक्षपणाचा फटका शेकडो शेतकर्यांना बसला आहे.
भुदरगड तालुक्यातील मुदाळ ते मिणचे खुर्द दरम्यात 17 किलोमीटर अंतर असणार्या दूधगंगा उजव्या कालव्याच्या परिसरातील शेकडो एकर जमीन कालव्याच्या गळतीमुळे क्षारपड बनली होती. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या 17 किलोमीटर अंतराच्या कालव्यासाठी 17 कोटींचा निधी मंजूर केला व चार महिन्यांपूर्वी अस्तरीकरण कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली.
मुदाळपासून पाचवडेपर्यंत कालवा 5 फूट आहे, तर पाचवडेपासून 3 फूट केला आहे. पाचवडेपासून पुढे कालवा अस्तरीकणाच्या वरून 3 फूट पाणी वाहते त्यामुळे पुन्हा एकदा शेतकर्यांची शेकडो एकर जमीन क्षारपड होण्याची भीती व्यक्त होत आहे.