“हलकर्णी फाट्यावर थरार: डंपरखाली बाइक, स्वाराचा चमत्कारिक बचाव” file photo
कोल्हापूर

“हलकर्णी फाट्यावर थरार: डंपरखाली बाइक, स्वाराचा चमत्कारिक बचाव”

“काळ समोर उभा… पण वेळ नव्हती! हलकर्णी फाट्यावर भीषण अपघातातून दुचाकीस्वार बचावला”

पुढारी वृत्तसेवा

The interstate route from Belgaum to Vengurla bike accident

चंदगड : पुढारी वृत्तसेवा

बेळगाव ते वेंगुर्ला या आंतरराज्य मार्गावर दौलत हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी चार वाजता ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दत्तू चाळू नाईक (वय 55, रा. वरगाव नाईकवाडा, ता. चंदगड) हे जखमी झाले. पण सुदैवाने ते या घटनेतून बचावले. त्यांची दुचाकी डंपरखाली आली. यामध्ये त्या दुचाकीचा अक्षरशः चंदामेंदा झाला. घटनास्थळी काळ बनून आला होता... पण वेळ आली नाही, अशी चर्चा सुरू होती.

या विषयी अधिक माहिती अशी की, कर्नाटक पासिंगचा खडी वाहतूक करणारा डंपर हा पाटणे फाटा येथून हलकर्णी गावामध्ये जात होता. याच दरम्यान हलकर्णी ते हलकर्णी फाटा असा प्रवास दुचाकीस्वार करत होता. यादरम्यान समोरासमोर हा अपघात झाला. जखमी दत्तू नाईक बाजूला जाऊन पडल्यामुळे बचावले.

त्यांची दुचाकी थेट डंपरच्या खाली सापडून चक्काचूर झाली. यामध्ये दत्तू यांच्या पायाला मार लागला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा चंदगड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT