Teacher killed by Dumper Kolhapur Accident
शिरोली एमआयडीसी : कोल्हापूर येथील गोखले कॉलेजजवळ भरधाव डंपरने मोपेडला पाठीमागून जोराची धडक दिल्याने शिक्षिका ठार झाली. आराध्या प्रसाद सावंत (वय ३६) असे मृत शिक्षिकेचे नाव असून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आराध्या सावंत या (नागाव, ता. हातकणंगले) येथील असून त्यांचे माहेर हॉकी स्टेडियम परिसरात आहे. त्यांना एक ९ महिन्यांची मुलगी असून त्या माहेरी रहात होत्या.
न्यू पॅलेस येथील शाहू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये त्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या. शाळा सुटल्यानंतर आपल्या दुचाकीवरून हॉकी स्टेडियम परिसरात असलेल्या घरी निघाल्या होत्या. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांच्या मोपेडला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना नऊ महिन्यांची एक मुलगी आहे. एका बेदरकार डंपरने एका कुटुंबाला उद्ध्वस्त केले. तर नऊ महिन्यांच्या कोवळ्या बालिकेची आई हिरावून नेत पोरके केले. या अपघाताची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.