Crime News pudhari photo
कोल्हापूर

Kolhapur|शिरोली परिसरातील गुन्हेगारीवर कठोर कारवाई, विविध टोळ्यांतील तब्बल २५ जण हद्दपार

Shiroli Crime Crackdown-शिरोली परिसरातील गुन्हेगारीवर कठोर कारवाई, विविध टोळ्यांतील तब्बल २५ जण हद्दपार

पुढारी वृत्तसेवा

नागाव : कोल्हापूर जिल्ह्यात आगामी सार्वजनिक गणेशोत्सव आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार, अवैध शस्त्र बाळगणारे आणि दहशत निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्यांमधील एकूण २५ जणांवर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलमा ५५ नुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार केलेले आरोपी्चीं नावे विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी (वय २८), टोळी प्रमुख, अनिकेत सुकुमार लाड उर्फ कोळी (वय २४), श्रीकांत महादेव कोळी (वय २७), राहुल उर्फ आकाश ईश्वर आयवळे (वय २९) सर्व जण रा. शिरोली पुलाची), आशिष लक्ष्मण वाडकर (वय २८, रा. नागाव, ता. हातकणंगले).

टोळी २ - अविनाश अनिल कोळी (वय ३५) - टोळी प्रमुख, श्रीकांत तानाजी मोहिते (वय ३४), कार्तिक परशुराम राजुग्रीकर (वय ३१), अनिकेत आनंदा कांबळे, ,ऋषिकेश उर्फ प्रताप शिवाजी भोरे, सर्व जण राहणार पुलाची शिरोली, गणेश जनार्दन जठार, संगम प्रकाश जाधव, युवराज शिवाजी जाधव, नंदकुमार वसंत खाडे, स्नेहंकित नंदकुमार खाडे, दिग्विजय नंदकुमार खाडे (सर्व जण राहणार जठारवाडी ता. करवीर) सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने हातकणंगले तालुका हददीतून हद्दपार (दि. १४/०९/२०२६ ते २५/०९/२०२६).

तसेच विकी आप्पासो सनदे, विशाल विठ्ठल कांबळे, विकास शिवाजी धनवडे, ऋषिकेश बजरंग पवार, ऋत्विक बजरंग पवार, पृथ्वीराज गजानन यादव, आदिनाथ बाळासो यादव, वैभव राज्यू बेडेकर, (सर्व जण राहणार पुलाची शिरोली) तर अर्जुन भगवान कारंडे (रा. संभापूर, ता. हातकणंगले) अशी नावे आहेत.

नागरिकांना आवाहन

वरीलपैकी कोणताही व्यक्ती शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत आढळल्यास नागरिकांनी तत्काळ शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे फोन क्र.०२३०-२४६८०१८ किंवा ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT