कोल्हापूर : सैनिक टाकळी ते खिद्रापूर दरम्यानचा मुख्य रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे.  (Pudhari Photo)
कोल्हापूर

Shirol Flood Updates | सैनिक टाकळी -खिद्रापूर रस्त्यावर पाणी, ३ हजारांवर लोकांचे स्थलांतर

पुढारी वृत्तसेवा

सैनिक टाकळी : संजीव गायकवाड

निक टाकळी - खिद्रापूर या मुख्य रस्त्यावर दोन फुटांवर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. राजापूरवाडी येथे पूरस्थिती गंभीर बनली असून तिन्ही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. आतापर्यंत खिद्रापूर राजापूर ,राजापूरवाडी येथील सुमारे ३०० कुटुंबांतील ३ हजारांवर लोकांनी जनावरांसह स्थलांतर केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. (Shirol Flood Updates)

Shirol Flood Updates : वाहतूक बंद

सैनिक टाकळीकडून खिद्रापूरकडे जाणाऱ्या ओतावरील पुलाच्या दुतर्फा रस्त्यावर रात्री १ फुटाने पाण्यात वाढ झाली. यामुळे आज वाहतूक बंद झाली आहे. या ठिकाणी पाण्याचा वेग प्रचंड आहे. तरीही काहीजण पाण्यातून दुचाकी-चारचाकी नेत असल्याचे दिसून आले आहे.

खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी येथील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी केवळ सैनिक टाकळी येथील हा एकच मार्ग उपलब्ध होता. त्यातूनच नागरिकांची ये-जा चालू होती. मात्र या मार्गावर रात्री पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT