Sharad Pawar Statement About Devendra Fadnavis  canva
कोल्हापूर

Sharad Pawar : देवाभाऊंनी याकडं लक्ष द्यावं... छत्रपती शिवाजी महाराज यांचं उदाहरण देत शरद पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार शरद पवार यांनी आज कोल्हापुरातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.

Anirudha Sankpal

Sharad Pawar Statement About Devendra Fadnavis :

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार शरद पवार यांनी आज कोल्हापुरातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. तसेच नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाबद्दल देखील वक्तव्य केलं. पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या जीआरनंतर केलेल्या जाहिरातबाजीवरून अप्रत्यक्षरित्या टोमणे मारले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देखील दिलं.

शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, 'शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांची जमीन नांगरणीशिवाय राहू नये म्हणून सोन्याचा फाळ दिला होता. तात्पर्य काय तर शिवाजी महाराजांचा याकडं पाहण्याचा दृष्टीकोण काय होता हे स्पष्ट होतं. मात्र दुसऱ्या बाजूला आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतीवृष्टीमुळं शेतीचं नुकासन झालं आहे. आता बघुयात सरकार पंचनामे कधी करतायत, प्रत्यक्ष मदत कधी पोहचते याकडं शेतकरी आशेनं पाहतोय. त्यामुळं देवाभाऊंनी या सगळ्याकडं अधिक लक्ष द्यावं.'

महानगरपालिका निवडणुकीबाबत देखील शरद पवार यांनी वक्तव्य केलं. त्यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीबाबत देखील वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीबाबत सर्वत्र एकच निर्णय होईल असं नाही. महाविकास आघाडी सगळीकडं एकत्र लढेल असं आज तरी सांगता येत नाही.'

शदर पवार यांना नरेंद्र मोदींच्या ७५ व्या वाढदिवसाबद्दल आणि त्यांच्या निवृत्तीबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, जर मी ७५ वर्षानंतर थांबोल नाही तर मी मोदींना थांबा म्हणू शकत नाही.

पवार यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत राज्यात निर्माण झालेल्या परिस्थिती बाबत देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी गावागावात कटूता निर्माण झालीये हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. सरकारनं याबाबत काही निर्णय घेतली. दोन समित्या निर्माण केल्या. मात्र यात एकाच जातीच्या लोकांचा समावेश करण्यात आला आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT