Shaktipeeth expressway protest File Photo
कोल्हापूर

Shaktipeeth highway: कोल्हापुरात 'शक्तिपीठ'च्या मॅपिंगविरोधात संतापाचा उद्रेक; भुदरगडमध्ये शेतकऱ्यांनी मोजणी मशीन पेटवलं

कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. महसूल विभागाने सुरू केलेल्या 'शक्तिपीठ'च्या अक्षांश, रेखांश मॅपिंगच्या माध्यमातून माहिती संकलनाला भुदरगड तालुक्यात शेतकऱ्यांनीही तीव्र विरोध केला आहे.

मोहन कारंडे

Shaktipeeth expressway protest

कोल्हापूर: कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. महसूल विभागाने सुरू केलेल्या 'शक्तिपीठ'च्या अक्षांश, रेखांश मॅपिंगच्या माध्यमातून माहिती संकलनाला भुदरगड तालुक्यात शेतकऱ्यांनीही तीव्र विरोध केला आहे. आज संतप्त शेतकऱ्यांनी केणवडे येथे शक्तिपीठ महामार्ग मोजणीचे एक मशीन आणि सर्वेक्षणासाठी आणलेला ट्रायपॉड स्टँड शेतकऱ्यांनी पेटवून दिला आहे.

मॅपिंगला पेरणोली, हरपवडेत विरोध

आजरा तालुक्यात पोळगाव, खानापूर, एरंडोळ येथे महसूल विभागाने पोलिस फाट्यासह सुरू केलेल्या 'शक्तिपीठ'च्या अक्षांश, रेखांश मॅपिंगच्या माध्यमातून माहिती संकलनाला तीव्र विरोध केल्यानंतर पेरणोली व हरपवडे येथील शेतकऱ्यांनीही तीव्र विरोध केला. सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायला निघाले असल्याची भावना शेतकऱ्यांनी तहसीलदार समीर माने व सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी ६० जणांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले.

कोणतीही पूर्वसूचना न देता संकलन सुरू केल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. 'शक्तिपीठ' विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा दिल्या. हरपवडे येथील रासुबाईच्या ओढ्यावर सकाळी ९ वाजता 'शक्तिपीठ'च्या माहिती संकलनासाठी प्रशासन हजर होते. ही माहिती शेतकऱ्यांना मिळताच पेरणोली व हरपवडे येथील शेतकऱ्यांनी धाव घेतली.

यावेळी कॉ. संपत देसाई, रामचंद्र हळवणकर यांनी मनोगतातून शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय मांडला. यावेळी कारखाना संचालक हरिबा कांबळे, अमर पवार, सुभाष देसाई, संकेत सावंत, उदय कोडक, धनाजी सावंत, पांडू पाईम, श्रीधर हळवणकर, दत्ता गुरव, निवृत्ती कांबळे, शिवराम गुरव, शंकर तिबिले, विष्णू हळवणकर आदी शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT