Kolhapur Anuskura land scam CID inquiry|''अणुस्कुरा येथे झालेल्या जमीन गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करा''

अणुस्कुरा येथे झालेल्या जमीन गैरव्यवहाराची 'सीआयडी' यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची भारतीय दलित महासंघाची मागणी
भारतीय दलित महासंघाच्या वतीने प्रांत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन दिले.
भारतीय दलित महासंघाच्या वतीने प्रांत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन दिले.
Published on: 
Updated on: 

बांबवडे : अणुस्कुरा (ता. शाहूवाडी) येथील गट नंबर 186 मधील 14.65 हेक्टर आर वर्ग २ ची जमीन बनावट सही व शिक्क्याचा वापर करून बनावट आदेशाच्याद्वारे वर्ग १ करण्यात आली आहे. या जमीन गैरव्यवहारात समाविष्ट असणाऱ्या दलालांवर शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु हे प्रकरण हे अतिशय गंभीर व शासन व्यवस्थेला आव्हान देणारे आहे.

या गंभीर प्रकरणात राजकीय नेते, भांडवलदार, महसूल विभागातील अधिकारी, दलाल, स्टॅम्प वेंडर, बनावट डिजिटल कागदपत्रे व शिक्के बनवणारे एजंट, कमिशनखोर कर्मचारी व पैसे गुंतवणूक करणारे धनदांडग्याचा समावेश असून त्यांचे एक रॅकेट शाहूवाडी तालुक्यात कार्यरत आहे त्याची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी भारतीय दलित महासंघाने केली आहे

संघटनेने प्रांतअधिकारी यांना लेखी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, या गंभीर प्रकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासकीय यंत्रणेवरील विश्वास उडाला असून महसूल विभागातील भ्रष्ट अधिकारी व राजकीय दलालांच्या महसूल विभागात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे तहसील, प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालय बदनाम होऊ लागले आहेत.

महसूल विभागात भ्रष्टाचाराच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. वर्ग दोनची जमीन खरेदी व विक्री करताना जिल्हाधिकारी व प्रांत यांची परवानगी बंधनकारक आहे. खरेदी-विक्री अधिकृत व्यवहार झाल्यानंतर पुढील नोंद ही ग्राममहसूल अधिकारी यांच्याद्वारे होत असते. परंतु असे कोणतेही कायदेशीर व्यवहार न करताआर्थिक हव्यासापायी, आर्थिक निकषावर सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन सदरचा बेकायदेशीर व्यवहार करण्यात आला आहे.

भारतीय दलित महासंघाच्या वतीने प्रांत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन दिले.
Kolhapur Crime : पाच टोळ्या, ३७ जणांना ‘मोका’, १० महिन्यांत पोलिसांचा दणका

शाहूवाडी तालुक्यात अनेक जमीन खरेदी-विक्री प्रकरणात फार मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. प्रशासकीय यंत्रणांना आर्थिक निकषावर ताब्यात ठेवून सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांचा बळी देऊन आर्थिकदृष्ट्या गब्बर होणारी टोळी शाहुवाडी तालुक्यात कार्यरत असल्याचे चित्र आहे.

शासनाने अणुस्कुरा या ठिकाणी झालेल्या जमीन गैरव्यवहाराची संवेदनशीलरीत्या दखल घेऊन त्या प्रकरणाची 'सीआयडी 'यंत्रणेमार्फत स्वतंत्र चौकशी करून यामध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक भ्रष्ट, बेजबाबदार व देशद्रोही घटकावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

या निवेदनावर अध्यक्ष श्रीकांत कांबळे, दयानंद कांबळे, आकाश कांबळे अमोल कांबळे यांच्या स्वक्षारी आहेत. त्याच्या प्रति महसूल मंत्री आणि त्या विभागाच्या वरिष्ठांना दिल्या आहेत.

भारतीय दलित महासंघाच्या वतीने प्रांत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन दिले.
Kolhapur Sugarcane Workers : उसाच्या फडात मातृत्वाची अग्‍निपरीक्षा; ११० गर्भवतींच्या वाट्याला संघर्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.