Vinay Kore Pudhari
कोल्हापूर

Vinay Kore | कडवी उपसा सिंचन योजनेस राज्य शासनाची मान्यता: आमदार डॉ. विनय कोरे

जलसंपदा विभागामार्फत कडवी नदीवरील सावे येथून जुळेवाडी खिंडीत पाणी उपसा

पुढारी वृत्तसेवा

Shahuwadi Kadvi Lift Irrigation Scheme approval

बांबवडे : शाहूवाडी तालुक्याच्या दक्षिण भागातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन कडवी उपसा सिंचन योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. जलसंपदा विभागामार्फत कडवी नदीवरील सावे येथून जुळेवाडी खिंडीत पाणी उपसा करण्याची ही योजना राबविण्यात येणार आहे.

आमदार डॉ. कोरे यांनी सांगितले की, शाहूवाडी तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक गावे सिंचनापासून वंचित होती. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई या भागात जाणवत होती. या समस्येची दखल घेऊन जलसंपदा व पाटबंधारे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

या संदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यानंतर या योजनेस अंतिम मंजुरी देण्यात आली. या योजनेद्वारे सावे येथील कडवी नदीतून पाईपद्वारे पाणी जूळेवाडी खिंड येथे उचलून विविध गावांना पुरवठा केला जाणार आहे.

या प्रकल्पामुळे गोगवे, बजागेवाडी, करंजोशी, आरुळ, आबांर्डे, ओकोली, करपेवाडी, परखंदळे, सावर्डे, सोनवडे, शित्तूर, साळशी, पिशवी, सुपात्रे, खुटाळवाडी तसेच पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे, आवळी, आपटी आणि जेऊर या गावांना लाभ होणार आहे.

या योजनेमुळे शाहूवाडी आणि पन्हाळा या दोन तालुक्यांतील सुमारे ७ हजार हेक्टर शेतीला पाणी उपलब्ध होणार असून, पिण्याच्या पाण्याच्या समस्येलाही मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT