कोल्हापूर

कोल्हापूर : शाहूवाडीत ग्रामपंचायतींसाठी ८३ टक्के, शिरगाव पोटनिवडणुकीसाठी ७८.२९ टक्के मतदान

अविनाश सुतार

विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील १० ग्रामपंचायतीसाठी ८३ टक्के तर शिरगाव गावाच्या पोटनिवडणूकीसाठी ७८.२९ टक्के मतदान झाले. १८९ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद झाले. तालुक्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १२ पैकी १० ग्रामपंचायतींसाठी एकूण ३१ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. तालुक्यात १० सार्वत्रिक निवडणुकीत ९०.७७ टक्के स्त्री मतदारांनी तर ७६.४२ टक्के पुरुष मतदारांनी आणि पोटनिवडणूकीत ८२.१३ टक्के स्त्री मतदारांनी तर ७४.७९ टक्के पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात सरासरी ८३.०३ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली.

१० सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ६३९० पुरुष मतदारांपैकी ४८८३ मतदारांनी तर ५७९४ महिला मतदारांपैकी ५२५९ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वात जास्त मतदान सावर्डे खुर्द येथे ९४.३८ टक्के झाले तर सर्वात कमी मतदान माण येथे ७२.४१ टक्के झाले. सर्वच ठिकाणी चुरशीने मतदान झाले. शिरगाव येथील पोटनिवडणुकीत ३४९ पुरुष मतदारांपैकी २६१ मतदारांनी तर ३१९ महिला मतदारांपैकी २६२ मतदारांनी मतदान केले.

गावनिहाय झालेले मतदान असे: मालेवाडी (८७.७८%), सावर्डे खुर्द (९४.३८ %), सुपात्रे (७९.६७ %), सावे (८७.०६ %), शेंबवणे (७४.२१ %), वालुर (८५.५१ %), माण (७२.८२ %), कासार्डे (८३.९० %), गेळवडे ( ९१.६३ %), आकुर्ले (८६.८५ %). शिरगाव (७८.२९ %).
गावनिहाय मतदान व प्रत्येक दोन तासाला दुपारी साडेतीन वाजेपर्यंत झालेले मतदानाची टक्केवारी अशी : मालेवाडी :- एकूण मतदान १०९७ ,सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत (१६.८६%), सकाळी ११.३० वाजता ४०.७५%, दुपारी दीड वाजता ७०.४६%, साडेतीन वाजता ८५.०५%, सायंकाळी ५.३० वाजता ८७.७८ %.

सावर्डे खुर्द एकूण मतदान ६२३, सकाळी साडेनऊपर्यंत २०.२२%, साडेअकरा वाजता ४९.९२%, दुपारी दीड वाजता ७७.६९ %, साडे तीन वाजता ९१.६५%. सुपात्रे एकूण मतदान १५३५, सकाळी साडेनऊपर्यंत १२.०५%, साडेअकरा वाजता ३३.९४%, दीड वाजता ५४.०१%, साडेतीन वाजता ७०.३६%. सावे एकूण मतदान २०६३, साडेनऊच्या दरम्यान ९.२५%, साडेअकराला २७.९६%, दीड वाजता ५१.०७%, साडेतीनला ७५.१९%. शेंबवणे एकूण मतदान ११०९, सकाळी साडेनऊ वाजता १०.४६%, साडे अकराला २९.९४%, दुपारी दीड वाजता ५८.९७%, दुपारी साडेतीन ७२.४१%.

वालुर एकूण मतदान १६०८, सकाळी साडेनऊ (१९.५३%), साडेअकरा (४२.४८%), दीडवाजता (७१.७०%), साडेतीन (८१.१६%). माण एकूण मतदान १७७७, सकाळी साडेनऊ ( १०.६४%), साडेअकरा (३१.५१%), दीडवाजता (५५.०४%), साडेतीन (६८.६६%).
कासार्डे एकूण मतदान ८०१, सकाळी साडेनऊ (२३.१०%), साडेअकरा (६५.४२%), दुपारी दीड ( ७९.२८%), साडेतीनला (८२.२७%). गेळवडे एकूण मतदान ४९०, सकाळी साडेनऊ (१०.४१%), साडेअकरा (३७.३५%), दुपारी दीड ( ५५.९२%), साडेतीनला (८८.५७%). आकुर्ले एकूण मतदान १०८०, सकाळी साडेनऊ (१४.२६%), साडेअकरा (४३.८०%), दुपारी दीड ( ७१.२०%), साडेतीनला (८२.९६%). पोटनिवडणूक एका जागेसाठी शिरगाव एकूण मतदान ६६८, सकाळी साडेनऊ (१०.९३%), साडेअकरा (३८.९२%), दुपारी दीड ( ६५.१२%), साडेतीनला (७४.१०%).

प्रशासनाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी उत्तमरित्या करण्यात आली होती. शनिवारी सकाळी नियुक्त केलेले निवडणूक कर्मचारी व अधिकारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले होते. रविवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मतदानप्रक्रियेसाठी ३१ मतदान केंद्रासाठी तहसील कार्यालय शेजारील धान्य गुदामात बनवलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये सर्व निवडणूक यंत्रे व अन्य साहित्य पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत.

प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन अधिकारी, शिपाई तसेच एक पोलीस कर्मचाऱ्यानी मतदानप्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. मतदान काळात निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी विविध मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्रावर करडी नजर ठेवण्यात आली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त संवेदनशील गावात तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT