कोल्हापूर

कोल्हापूर: वडणगेतील प्रेरणा आळवेकरची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

अविनाश सुतार

वडणगे: पुढारी वृत्तसेवा: पुणे (बालेवाडी) येथे २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी वडणगे (ता.करवीर) येथील प्रेरणा शिवाजी आळवेकर हिची निवड झाली आहे. या स्पर्धेत प्रेरणा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून ही संधी तब्बल ४२ वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला मिळाली आहे.

या स्पर्धेत भारताचे आघाडीचे खेळाडू सायना नेहवाल, एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन, सात्त्विक साईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, पारुपल्ली कश्यप, मालविका बनसोड, गायत्री गोपीचंद, ट्रिसा जॉली या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.

वडणगे सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या प्रेरणाने अत्यंत खडतर परिश्रमातून राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे. प्रेरणाला कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिशनचे मुख्य प्रशिक्षक तन्मय करमरकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, बाळासाहेब यादव, वडील शिवाजी आळवेकर यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT