सलग तिस-या वर्षी ओव्हरफ्लो झालेला सर्फनाला प्रकल्प Pudhari
कोल्हापूर

Sarfnala Dam | आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्प ओव्हरफ्लो; सलग तिसऱ्या वर्षी जलसाठा पूर्ण

आंबेओहळ प्रकल्प ७७ टक्के, चित्री प्रकल्प ७० टक्के, तर उचंगी प्रकल्प ३० टक्के भरला

पुढारी वृत्तसेवा

Sarfnala Reservoir Overflow

आजरा : आजरा तालुक्यातील सर्फनाला लघु पाटबंधारे प्रकल्प रविवारी रात्री ओव्हरफ्लो झाला. सलग तिसऱ्या वर्षी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे परिसरातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

रविवारी सायंकाळी आठ वाजेपर्यंत प्रकल्पातील जलसाठा शंभर टक्के झाला होता. त्यानंतर पाण्याची आवक कायम राहिल्याने रात्री नऊ वाजल्यानंतर धरण ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली. मान्सूनच्या पावसाचा वेग वाढल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला.

तालुक्यातील इतर प्रकल्पांमध्येही समाधानकारक जलसाठा झाला आहे. आंबेओहळ प्रकल्प सध्या ७७ टक्के, चित्री प्रकल्प ७० टक्के, तर उचंगी प्रकल्प ३० टक्के भरला आहे. आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास या प्रकल्पांतील जलसाठ्यातही आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सर्फनाला प्रकल्पात नियमितपणे पाणीसाठा होत असून, त्या दोन्ही वर्षांतही प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता. यंदा सलग तिसऱ्या वर्षीही प्रकल्प पूर्ण भरल्याने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

गतवर्षी ११ मेपासूनच मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यामुळे जून महिन्यातच सर्फनाला प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता. मात्र, यंदा मान्सूनचे आगमन आणि पावसाचा वेग तुलनेने उशिरा वाढल्याने प्रकल्प जुलैच्या अखेरीस पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला. तरीही सध्याचा जलसाठा समाधानकारक असून, आगामी रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने हा दिलासादायक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT