कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जपान मधील फुकुओका येथे जागतिक जलतरण संघटने (फिना) तर्फे दि. ५ ते ११ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड अॅक्वॅटिक मास्टर्स चॅम्पियनशिप (जलतरण) स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात कोल्हापूरच्या रोहित राजेंद्र हवालदार याची निवड झाली आहे. या स्पर्धेत रोहित १०० व २०० मीटर बॅक स्ट्रोक, २०० मीटर फ्री स्टाईल व रिले प्रकारात सहभागी होणार आहे.
रोहितने अजापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, साऊथ एशियन गेम्स आदी आंतरराष्ट्रीय तसेच विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व करून विविध पदकांसह विशेष प्राविण्य मिळविले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने त्याचा गौरव करण्यात आला आहे.
-.हेही वाचलं का