महसूल सहायक रमेश दगडू राठोड याला लाच प्रकरणी अटक  
कोल्हापूर

कोल्‍हापूर : २५०० रुपयांची लाच घेताना महसूल सहायक जाळ्यात

रणजित गायकवाड

कोल्‍हापूर : पुढारी वृत्तसेवा

वर्ग दोन जमिनीवरील इनामी जमीन हा शेरा काढण्‍यासाठी २५०० रुपयांची लाच घेताना महसूल सहायक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या जाळ्यात अडकला. रमेश दगडू राठोड (वय ३७) असे संशयिताचे नाव आहे. हातकणंगले तहसिलदार कार्यालय परिसरात ही कारवाई झाली.

तक्रारदाराची जमीन वर्ग दोनची आहे. ती वर्ग १ करण्‍यासाठी त्‍यावरील नोंदीमध्‍ये इनामी जमीन नसलेचा शेरा आवश्‍यक होता. या कामासाठी ते संशयित राठोड याला भेटले. त्‍याने सुरुवातीला ३ हजार रुपयांची मागणी केली. तर तडजोडीनंतर २५०० रुपयांवर तो तयार झाला होता. ही रक्‍कम स्‍विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्‍याला रंगेहाथ पकडले. उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश मोरे, सहायक फौजदार संजीव बम्बर्गेकर, सुनिल घोसाळकर, नवनाथ कदम, कृष्णात पाटील आदींनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT