मुदाळतिट्टा : कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील व शिवसेना (शिंदे गट) कोल्हापूर जिल्हा माजी प्रमुख माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटामध्ये) येत्या 9 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार , पक्षाचे नेते सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
मुरगुड ता. कागल येथे रणजीत सिंह पाटील यांच्या निवासस्थानी रणजीत सिंह पाटील गट व राजेखान गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद संपन्न झाली. कागल तालुक्यातून 500 वरून अधिक आपले कार्यकर्ते प्रवेशाच्या वेळी उपस्थित राहणार आहेत.
राजे खान जमादार हे खासदार संजय मंडलिक यांच्या गटातून तर रणजीत सिंह पाटील हे समजितसिंह घाटगे यांच्या गटातून बाहेर पडून ते नाम. मुश्रीफ गटामध्ये प्रवेश करणार आहेत.
यावेळी रणजीत सिंह पाटील म्हणाले कागल तालुक्याच्या विकासासाठी व मुरगुडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नाम. मुश्रीफ यांना विनाअट्ट साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासमवेत माझे संपूर्ण कार्यकर्ते आहेत. राजेखान जमादार म्हणाले आपण रणजीतसिंह पाटील गटाशी एकनिष्ठ राहून आगामी निवडणुकीला सामोरे जायचे ठरवले होते. नाम. मुश्रीफ यांनी फोनवरून संपर्क साधल्याने रणजीतसिंह पाटील यांच्याबरोबरच माझ्या गटाच्या कार्यकर्त्यांचाही प्रवेश होणार आहे. जमादार यांनी रणजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही दोघेही मुश्रीफ गटांमध्ये प्रवेश करत असल्याचे दोघांनी स्पष्ट केले.
यावेळी स्वागत माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर यांनी केले. बजरंग सोनुले मधुकर करडे बाबजी दिवटणकर रघुनाथ पाटील विशाल सूर्यवंशी, अशोक खंडागळे किरण कुंभार अमर सनगर विश्वजीत पाटील सुनील चौगले, दत्तात्रय जाधव, प्रकाश हळदकर आदी मान्यवर उपस्थित होते. आभार विश्वजीत पाटील यांनी मांनले.