Rahul Patil  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक पदी राहुल पाटील यांची निवड

Rahul Patil | राजाराम पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर मुलाची निवड

पुढारी वृत्तसेवा

Bhogawati Shikshan Prasarak Mandal

गुडाळ : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाची कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयात शनिवारी (दि.२५) बैठक होऊन संचालक पदी खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील राहुल राजाराम पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय पाटी.ल यांचे ते समर्थक आहेत.

दोन महिन्यापूर्वी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक राजाराम बापू पाटील यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे सुपुत्र असलेल्या राहुल यांची निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिगंबर मेडशिंगे हे होते.

संचालक मंडळाच्या बैठकीत संस्थेचे संचालक राजेंद्र आडके यांनी राहुल पाटील यांचे नाव सुचवले बाजीराव चौगले यांनी त्यांना अनुमोदन दिले.

राहुल पाटील यांनी या निवडीबाबत ए. वाय. पाटील यांच्यासह शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ आणि खिंडी व्हरवडे येथील सर्वपक्षीय नेते मंडळींचे आभार मानले.

यावेळी भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, व्हाईस चेअरमन मोहन पाटील यांचे सह सर्व संचालक मंडळ, प्राचार्य नेताजी पाटील, टी पी पाटील, एस के पाटील,राजकुमार पाटील, तानाजी पाटील,डी एम पाटील, सुनील पाटील, अर्जुन पाटील,प्रतीक पाटील,गणपती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सुभाष पाटील यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT