राधानगरी धरण  Pudhari File Photo
कोल्हापूर

राधानगरी धरण 91 टक्के भरले

नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहाण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

राधानगरी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण 91 टक्के भरले आहे. धरण 347.50 फूट पाणी पातळी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरते. पावसाचा जोर कायम राहिल्यास बुधवारी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. सध्याची पुरस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहाण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

मंगळवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात 137 मिमी तर दुपारी चार वाजता संपलेल्या चोवीस तासात 49 मिमी पावसाची नोंद झाली असून जुनपासून आज अखेर 2603 मिमी पाऊस झाला आहे. धरणाची पातळी 342.90 फूट असून पाणीसाठा 7504.48 द.ल.घ.फू. झाला आहे. धरणातून विद्युतगृहासाठी 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT