प्रातिनिधिक फोटो.  File Photo
कोल्हापूर

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे आणखी दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

भोगावती नदी पात्रात ७ हजार ११२ क्यूसेकचा विसर्ग

पुढारी वृत्तसेवा

Radhanagari Dam gates open : कोल्हापूरकरांची जीवनदायिनी असलेल्या राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाचे आणखी दोन स्वयंचलित दरवाजे आज उघडले आहेत. त्यामुळे आता धरणाचे एकूण ४ स्वयंचलित दरवाजे खुली झाली असून भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

भोगावती नदी पात्रात ७ हजार ११२ क्यूसेकचा विसर्ग

३१ जुलै २०२६ रोजी राधानगरी धरण १०० टक्‍के भरले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी क्र. ६ चा स्वयंचलित दरवाजा खुला झाला होता या दरवाजातून १४२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाचे आणखी दोन स्वयंचलित दरवाजे आज उघडले आहेत. त्यामुळे आता धरणाचे एकूण ४ स्वयंचलित दरवाजे खुली झाली आहेत एका दरवाजातून १,४२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होतो. त्यानुसार सध्या चार दरवाजांमधून तब्बल ५,७१२ क्यूसेक पाणी थेट नदीपात्रात झेपावत आहे.याशिवाय धरणाच्या हायड्रो पॉवर हाऊसमधून (वीज निर्मिती प्रकल्प) १,४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धरणातून सद्यस्थितीत भोगावती नदीपात्रात एकूण ७,११२ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धरणातून सुरू असलेल्या या मोठ्या विसर्गामुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, नदीकाठच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीपात्रात उतरणे, गुरे-ढोरे सोडणे आणि पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT