13 ऑक्टोबर रोजी 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. (Pudhari Photo)
कोल्हापूर

स्वप्न नव्या महाराष्ट्राचे! पाहा पुढारी NEWS वर

विकास SUMMIT 2024 रविवार, १३ ऑक्टोबरला पुढारी NEWS वर

पुढारी वृत्तसेवा

पुढारी वृत्तसेवा : 'आवाज जनतेचा' हे ब्रीद घेऊन अल्पावधीतच महाराष्ट्रातील जनमाणसावर अमिट छाप उमटवणाऱ्या 'पुढारी NEWS' ने 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आधारित 13 ऑक्टोबर रोजी 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील उद्योग, महिला कल्याण, आरोग्य व कृषी या क्षेत्रातील सर्वांगिण विकासावर राज्यातील मंत्री, तज्ज्ञ, समाजसेवक, धोरणकर्ते आदी मान्यवरांकडून चर्चा या माध्यमातून होणार आहे. द फर्न हॉटेल, कोल्हापूर येथे हे विकास समिट होत असून त्याचे थेट प्रक्षेपण पुढारी न्यूज चॅनेलवरुन होईल.

चर्चेतून आखला जाणार महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचा रोडमॅप....

'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' च्या माध्यमातून होणाऱ्या चर्चेत उद्योग, महिला कल्याण, आरोग्य आणि कृषी हे विषय केंद्रस्थानी असतील. यावेळी महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासधोरणांचा राज्यातील मंत्री, समाजसेवक, धोरणकर्ते यांच्या चर्चेतून रोडमॅप आखला जाईल.

'हे' मान्यवर सहभागी होणार

यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण व विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत, राज्य नियोजन मंडळाचे (मंत्रीपद दर्जा) कार्यकारी अध्यक्ष राजेश श्रीरसागर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (मंत्रीपद दर्जा) अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार विनय कोरे, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आयुष्यमान भारत मिशनचे राज्य प्रमुख ओमप्रकाश शेटे, एमसीसीआयएचे निवृत्त महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी आदी मान्यवर या कार्यक्रमातील चर्चेत सहभागी होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT