नृसिंहवाडी, पुढारी वृत्तसेवा येथील प्रबुद्ध नगर वसाहत रस्त्यापासून खोल खड्ड्यात आहे. त्यामुळे तिथे पुराचे पाणी जलगतीने साठते. यावेळी सुमारे 50 कुटुंबांना तातडीने हायस्कूल तसेच शाळेत आसरा घ्यावा लागतो. मागील पन्नासहून अधिक वर्षे या कुटुंबाची परिस्थिती अशी आहे. हे चित्र लक्षात घेऊन त्यांना चांगली घरे बांधून देण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी तहसीलदार स्थानिक ग्राम पंचायत यांनी या प्रश्नी तातडीने लक्ष देणेची गरज आहे.
या दलित वसाहतीत अनेक गरीब कुटुंबे आहेत. बहुसंख्य कुटुंबे येथील ग्रामपंचायतीतमध्ये स्वच्छता कामगार म्हणून काम करताता. सध्या येथील महापुराबाबत कृष्णा पंचगंगा नदीचे पाणी वाढताना ही चिंता व उतरतानाही चिंता अशा दुहेरी कात्रीत ही कुटुंबे जीवन कंठीत आहेत. येथे महापूर येऊन काही दिवस झाले आहेत. घरात पाणी शिरले अथवा घरासमोरुन पाणी हटले नाही तरी या कुटुंबाला पुराच्या यातना भोगाव्या लागतात ही परिस्थिती केव्हा बदलणार असा सवाल येथील गरीब कुटुंबांचा आहे. नृसिंह वाडी येथील कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमामुळे पाण्यात सातत्याने वाढ होते पूरग्रस्त मंडळी पाणी केव्हा उतरणार हे विचारतात परंतु त्याचे उत्तर लवकर मिळत नाही त्यामुळे चिंता तसेच भीती येथे सध्या वाढत चालली आहे