Kolhapur Rain Update
पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी  File Photo
कोल्हापूर

Kolhapur Rain Update |कोल्हापूरला पुराचा धोका; पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी

सोनाली जाधव

पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरला पुराचा धोका कायम असून पंचगंगा नदीची पाणी पातळी आज (२२ जुलै) दुपारी १२ वाजता ३९ फूट १ इंच इतकी झाली आहे. ३९ फूट पाणीपातळी ही नदीची इशारा पातळी आहे. जिल्‍हा आणि शहरात गेले तीन दिवसांपासून पावसाचा जाेर कायम हाेता. त्‍यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. (Kolhapur Rain Update) दरम्‍यान, आज सकाळपासून पावसाने थाेडी उसंत घेतली असली तरी धरणक्षेत्रात पावसाचा जाेर कायम आहे. पुढील दाेन पावसाचा जाेर कसा राहताे, यावरच कोल्‍हापुरातील पूरस्‍थिती स्‍पष्‍ट होणार आहे.

कोल्हापूरला पुराचा धोका वाढला

जिल्‍हा आणि शहरात गेले तीन दिवस पावसाच्या जोरदार पाऊस आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. साेमवारी ( दि. २२ जुलै) दुपारी १२ वाजता पंचगंगा नदीच्‍या राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ३९ फूट १ इंचावर पोहोचली. कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील एकूण ८१ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी रस्‍ते हे वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. जिल्‍हा आपत्‍ती विभागाकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपययोजना केल्‍या असून, नदी काठावरील गावे तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्‍या आहेत. (Kolhapur Rain)

दीडशे गावांचा संपर्क तुटला

जिल्ह्यातील एकुण ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दीडशेवर गावांचा संपर्क तुटला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगा इशारा पातळी गाठली आहे. त्‍यामुळे पुराचा धोका वाढला आहे. दरम्यान, प्रयाग चिखली परिसरातील नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. पंचगंगा नदीकाठच्या गावांतील लोकांना प्रशासनाने सावधानेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राधानगरी धरण ८३ टक्के भरले!

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, आज (सोमवार) सकाळी राधानगरी धरण 83 टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या दोन ते तीन दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. जुनपासून आज अखेर 2417 मिमी पाऊस झाला आहे. धरणाची पाणी पातळी 339.51 फूट असून पाणीसाठा - 6915.30 द.ल.घ.फु. झाला आहे. धरणातुन विद्युतगृहासाठी 1450 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. साधारणपणे हा विसर्ग धरण भरल्यानंतर उघडणाऱ्या स्वयंचलित दरवाजापैकी एका दरवाजा मधून होणाऱ्या पाणी विसर्गा एवढा आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या दोन ते तीन दिवसातधरण भरण्याची शक्यता आहे.

पंचगंगा धाेका पातळी ४३ फूट

 राजाराम बंधारा येथे पंचगंगेने ३९ फूट उंची गाठली की, ती इशारा पातळी समजली जाते. पाणी पातळी ४३ फुटांवर गेल्यावर त्याला धोकापातळी आहे. मात्र २०१९ व २०२१ मध्ये पंचगंगेने थेट ५६ फूट पाणी पातळी ओलांडली होती. या महाप्रलयामुळे शहरवासीयांची त्रेधा उडाली होती.

नागरिकांसाठी हेल्पलाईन

 कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्वयं माहिती प्रणालीत मान्सून काळात जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत माहिती व्हाटसअॅपवर मिळू शकते.  जिल्ह्यातील नागरिकांनी 9209269995 हा मोबाईल क्रमांकावर  कोल्हापूर हेल्पलाईन म्हणून सेव्ह करावा, व्हॉटसअपवरुन या नंबरवर 1 ते 6 पैकी क्रमांक मेसेज करावेत. यावर पाऊस, धरण पाणी पातळी, रस्ते, इ. बाबतची सर्व माहिती मिळेल.

उदा. तुम्ही  9209269995 या मोबाईल क्रमांकावर ३ असा मेसेज केला तर तुम्हाला पंचगंगा पाणी पातळी किती आहे याची माहिती मिळेल

1. पर्जन्यमान (Rainfall)

2. धरण व पाणी पातळी अहवाल (Water Level Information)

3. पंचगंगा पाणी पातळी (Panchaganga River Water Level) 

4. महत्वाचे संदेश (Important Messages)

5. आपत्कालीन संपर्क क्रमांक (Emergency Contact)

6. रस्ते व वाहतूक (Road and Transport)

7. पुर पातळी नुसार पाणी भागात येण्याची संभाव्य ठिकाणे..

SCROLL FOR NEXT