कोल्हापूर : कळे - गगनबावडा मार्ग वाहतुकीस बंद

गगनबावड्यात मुसळधार; सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम
Kale - Gaganbawda road closed
कळे - गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला.Pudahri File Photo

साळवण : दोन दिवसापासून तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जोरदार अतिवृष्टीमुळे कुंभी व रूपनी नदीपात्रात पाणी वाढल्याने खोकुर्ले व मांडुकलीनजीक रस्त्यावर पाणी आले असून गगनबावडा पोलिसांनी कळे - गगनबावडा मार्ग रविवारी (दि.२१) वाहतुकीस बंद करण्यात आला.

Kale - Gaganbawda road closed
महत्वाची बातमी : दगडूशेठ गणपतीला जाताय? आज शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद; पर्यायी मार्ग वापरा

सततच्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तालुक्यातील सांगशी, असळज, शेणवडे, मांडुकली व वेतवडे येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कुंभी पाणलोट क्षेत्रात आज (रविवारी) झालेल्या ८ तासात १०३ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर एकूण २६७८ मि.मी पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news