कोल्हापूर

Navratrotsav 2023 : कसबा बावडा येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने दुर्गा दौडचे आयोजन

मोहन कारंडे

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून कसबा बावडा, लाईन बाजार येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी विजया दशमीनिमित्त संपूर्ण गावठाण मधून काढण्यात आलेल्या दौडमध्ये मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले होते. माळ गल्ली येथे सकाळी झालेल्या दौडच्या सांगता प्रसंगी गेले नऊ दिवस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांचा स्मृतिचिन्ह आणि फेटा देऊन सत्कार करण्यात आला. (Navratrotsav 2023)

नवव्या दिवशी रेणुका मंदिर येथून ध्वजपूजन व प्रार्थनेने दुर्गा दौडला सुरुवात झाली. दौडच्या अग्रभागी भगवा ध्वज घेतलेला धारकरी त्याचबरोबर शिवाजी महाराज, संभाजी महाराज यासह मावळ्यांची वेषभूषा केलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते. दौड कवडे गल्ली, धनगर गल्ली, चव्हाण गल्ली, ठोंबरे गल्ली, रणदिवे गल्ली, वेटाळे गल्ली, वाडकर गल्ली, चौगले गल्ली, पाटील गल्ली, हनुमान गल्ली, आंबे गल्ली, बलभीम गल्ली, जय भवानी गल्ली, पिंजार गल्ली मार्गे दौड माळ गल्ली येथे येऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत शपथ घेऊन दौडची सांगता झाली. (Navratrotsav 2023)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT