कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँके निवडणूकांमध्ये अनुसूचित जाती गटामधून हातकणंगले तालुक्याचे आमदार राजू आवळे निवडून आले आहेत. ते सत्ताधारी गटाकडून उमेदवार होते. राजू आवळे यांच्या विरोधात शिवसेनेचे उत्तम कांबळे विरोधी उमेदवार होते. (KDCC Bank election update) आमदार राजू आवळे यांच्या विजयाने तालुक्यात जल्लोष केला जात आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागली होती. उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते आकडेमोड सुरू करून किती मते पडतील, याचा अंदाज घेत होते. आमदार राजू बाबा आवळे व शिवसेनेचे उत्तम कांबळे यांच्या निकालाकडे नजरा लागल्या होत्या. (KDCC Bank election update)
हेही वाचा: