शिरोली पुलाची: टोप (ता.हातकणंगले) येथील अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी प्रणित धोंडीराम कांबळे (वय 20, रा. राजीव गांधीनगर टोप ) या युवकाविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संबंधित फिर्यादी सतरा वर्षीय युवती व आरोपी प्रणित कांबळे टोप येथे राहतात. फिर्यादी मुलीने दिलेल्या माहितीनुसार आरोपीने गेल्या काही महिन्यापासून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती झाली. तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरकारी रुग्णालयात तिने मुलीला जन्म दिला. त्यामुळे प्रणित कांबळे यांच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणाचा अधिक तपास शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.