

गडहिंग्लज : येथील एका 27 वर्षे महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवून तिला लग्नास नकार देत दुसर्या महिलेशी लग्न केल्यामुळे पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून परमेश्वर सदाशिव गोदरे (27, रा. ब्रह्मवाडी, ता. हदगाव, जिल्हा नांदेड, सध्या रा. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार एप्रिल 2024 ते मे 2025 पर्यंत पीडिता राहात असलेल्या गडहिंग्लजमधील घरामध्ये येऊन परमेश्वर याने तिला लग्नाच्या आमिष दाखवत तिच्याशी शरीरसंबंध ठेवून तिच्याऐवजी दुसर्याच मुलीशी लग्न करत तिची फसवणूक केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पीडितेने गडहिंग्लज पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.