महावितरण कर्मच्याऱ्यांनी प्रयाग चिखली येथील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची भर पावसात दुरुस्ती केली. Pudhari Photo
कोल्हापूर

भरपावसात महावितरण कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा केला सुरळीत

पुढारी वृत्तसेवा

प्रयाग चिखली : प्रयाग चिखली व सोनतळी या दोन गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळील ट्रान्सफॉर्मर वर गुरुवारी वीज पडल्याने नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर ची दुरुस्ती भर पावसातून अवघ्या बारा तासात करून पाणीपुरवठा सुरळीत करणाऱ्या महावितरण कंपनीच्या अभियंता व कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले.

प्रयाग चिखली आणि सोनतळी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळील ट्रान्सफॉर्मरवर वीज कोसळल्याने ट्रान्सफॉर्मर जळाला. त्यामुळे चिखली व सोनतळी गावाचा पाणीपुरवठा काही दिवस खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, महावितरणचे कोल्हापूर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्यामुळे तात्काळ ट्रान्सफार्मर उपलब्ध करून दिला.

त्यांच्या मार्गदर्शनानुसार महावितरण कर्मच्याऱ्यांनी शुक्रवारी पहाटेपासून काम सुरू केले. प्रचंड पाऊस असल्यामुळे कामामध्ये व्यत्यय निर्माण होत असताना देखील कनिष्ठ अभियंता मंदार भणगे यांच्यासह महावितरणचे कर्मचारी मानसिंग जगदाळे सौरभ हराळे, संजय मर्दानी, संग्राम पाटील, दादासो नरबट, यांच्यासह पाणीपुरवठ्याचे कर्मचारी शिवाजी पाटील यांनी दिवसभर भर पावसात कठोर परिश्रम करून ट्रान्सफार्मर बदलला आणि अवघ्या बारा तासात वीस पुरवठा सुरळीत केला.

त्यामुळे दोन गावाच्या पाणीपुरवठ्याची गैरसोय थांबली. वीज कर्मचाऱ्यांनी जिद्दीने दिवसभर पावसामध्ये राबून ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबवल्याने दोन्ही गावातून अभियंता दीपक पाटील, कनिष्ठ अभियंता मंदार भंणगे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT