Mahavitaran | मोशीकर 20 तास अंधारात; मोशीत महावितरण विरोधात आंदोलन

केबल तुटल्याने वीजपुरवठा खंडित
 मोशीकर 20 तास अंधारात
मोशीकर 20 तास अंधारातFile photo
Published on
Updated on

मोशी : पुढारी वृत्तसेवा

येथील बोऱ्हाडेवाडी वूड्सविले फेज २ येथे रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता जनअक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महावितरण प्रशासनाला विरोध करत अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मोशी येथील शिवसेनेच्या स्थानिक नेत्या रूपाली परशुराम आल्हाट यांच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला स्थानिक नागरिक आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांनी मोठा पाठिंबा दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे, सुलभा उबाळे, माजी नगर- सेवक वसंत बोराटे, रुपाली आल्हाट, परशुराम आल्हाट, धनंजय आल्हाट, वसंत बोराटे,

ज्ञानेश्वर बोऱ्हाडे व महाविकास आघाडीचे विद्युत राज्य धनंजय पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरणाला वारंवार जाणाऱ्या वीज विरोधात जाब विचारत धारेवर धरले. नागरिक विनायक रणसुभे, आशा भालेकर, गौरी घंटे, सुनील समगिर, सागर बोराटे, गणेश गायकवाड, निलेश बोराटे, नितीन लगडे, परमेश्वर आल्हाट, राहुल पाटील, किरण जाधव, संदीप आल्हाट, अशोक गायकवाड उपस्थित होते.

मोशी परिसरात शनिवारी (दि. २१) रोजी रात्री अकरा वाजता विद्युत पुरवठा करणारी केबल तुटल्यामुळे २० तासांपासून या भागातला वीजपुरवठा खंडित झाला. बोराडे वाडी, बारणे वस्ती आदी परिसर अंधारात असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचा प्रकार घडला आहे.

दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी पाच वाजता येथील विद्युत पुरवठा सुरळीत झाला. मोशी परिसरात खंडित वीजपुरवठ्याची समस्या सतत सुरू आहे. एमआयडीसी परिसर जवळच असल्याने कामगारांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात आहे.

परिसरातील सोसायटी आणि लोकवस्तीतील रहिवासी सततच्या वीज समस्येमुळे हैराण झाले आहेत. लघु उद्योगांनाही त्याचा फटका बसत आहे. व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. वीजे अभावी सोसायट्यांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. रविवार सुट्टीचा दिवशी नागरिकांना लाईट व पाण्यावाचून दिवस घालवावा लागला.

अनेकांना पिण्याचे पाणी विकत आणावे लागले. त्यामुळे हजारो रुपये वीजबिल भरून देखील मोशी परिसरातील नागरिकांना विजच्या समस्येला सामोर जावे लागत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढून ही समस्या दूर करावी, अशी मागणी येथील होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news