Madhuri Elephant  
कोल्हापूर

Madhuri Elephant : ‘माधुरी हत्ती आपल्या घरी येणार’, कृष्णाकाठच्या सात गावांत उत्साह!

गावागावांत नागरिकांमध्ये उत्सुकता; स्वागताच्या तयारीला वेग

पुढारी वृत्तसेवा

कवठेगुलंद : ‘माधुरी हत्ती आपल्या घरी येणार’ या बातमीने कृष्णा नदीपलीकडील सात गावांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माधुरी हत्तीच्या आगमनाची माहिती मिळताच नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, गावागावांत तिच्या स्वागताची चर्चा रंगली आहे.

माधुरी हत्तीचे आगमन हा नागरिकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरला असून, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुकता आहे. हत्तीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून स्वागताची तयारी करण्यात येत आहे.

आलास, बुबनाळ, शेडशाळ, गौरवाड, औरवाड, गणेशवाडी यासह कृष्णा नदीपलीकडील परिसरातील गावांमध्ये सध्या माधुरी हत्तीच्या आगमनाचीच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही तिच्या आगमनाबाबत संदेश प्रसारित होत असल्याने उत्सुकतेत आणखी भर पडली आहे.

दरम्यान, माधुरी हत्तीच्या आगमनावेळी नागरिकांनी गर्दी न करता वनविभाग व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, हत्तीला त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये आणि सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT