कोल्हापूर

Lok Sabha Election Code of Conduct : लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा चांदी उद्योगाला फटका

अविनाश सुतार


हुपरी: हुपरी परिसरातील चांदी उद्योजकांचा निवडणूक आचारसंहिता काळात निर्भयपणे व्यापार चालू राहावा. व कोणत्याही संशयावरून सोने चांदीचे दागिणे जप्त होऊ नयेत. यासाठी सोने चांदी उद्योजकांना परप्रांतात वाहतुकीच्या दरम्यान कोणती आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावीत. याचे मार्गदर्शन देण्याची लेखी मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे चांदी हस्तकला उदयोग विकास फाऊंडेशनने केली होती. Lok Sabha Election Code of Conduct

परंतु, जिल्हा प्रशासनाने आचारसंहिता लागण्यापूर्वी लेखी मार्गदर्शन देण्याचे कबूल करूनसुद्धा दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हुपरी परिसरातील चांदी उद्योग ऐन हंगामात बंद राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. साहजिकच या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कारागिरांवर बेकारीचे संकट उभे राहणार आहे. त्यामुळे कारागीरांचा विचार करून योग्य ती खबरदारी घेऊन चांदी उद्योग चालू राहण्यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी चांदी उद्योजकांतून होत आहे. Lok Sabha Election Code of Conduct

लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर देशभर निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी नाके उभारले जातात. सर्वसामान्य नागरिक, व्यापारी तसेच बँकांचा पैसे दागिणे पकडण्याच्या घटना वारंवार घडताना दिसतात. या भीतीतून हुपरी परिसरातील चांदी उद्योजक ऐन हंगामात दागिन्यांची मागणी असून सुद्धा बाजारपेठेत माल घेऊन जाण्यास इच्छुक नाहीत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता देशभरात तीन महिने आणि महाराष्ट्रात दीड महिना असेल. नेमक्या या काळात लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे सोने, चांदीच्या दागिण्यांना मोठी मागणी असते. देशभर कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका चालू असतात. त्यामुळे आचारसंहितेमुळे सोने, चांदी व्यापार ठप्प राहतो. त्यामुळे देशात एकाच वेळी एक नेशन एक इलेक्शन होऊ दे. अशीही मागणी चांदी उद्योजकांतून होऊ लागली आहे.

४ मार्चरोजी झालेल्या जनता दरबारामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आचारसंहिता काळात चांदी उद्योग निर्विघ्नपणे चालू राहण्यासाठी उद्योजकांनी कोणती खबरदारी घ्यावी. याची लेखी माहिती देण्याचा आदेश जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकारी यांना दिला होता. परंतु, अद्यापही याबाबत काहीही मार्गदर्शन मिळालेले नाही. यासंदर्भात विविध ठिकाणी निवेदने दिली आहेत .

– मोहन खोत, संस्थापक संचालक, हुपरी चांदी हस्तकला उदयोग विकास फाऊंडेशन

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT