Kurundwad Chairperson Election Pudhari
कोल्हापूर

Kurundwad Municipal News | कुरुंदवाड नगरपालिका : विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीत राजर्षी शाहू विकास आघाडीचे वर्चस्व

स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा मनीषा डांगे यांची निवड

पुढारी वृत्तसेवा

Kurundwad Chairperson Election

कुरुंदवाड : कुरुंदवाड नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडी मंगळवारी पार पडल्या. या निवडीत राजर्षी शाहू विकास आघाडीने सर्व समित्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा मनीषा डांगे यांची निवड झाली. आरोग्य, स्वच्छता व साफसफाई समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांची निवड करण्यात आली. बांधकाम समितीच्या सभापतीपदी अक्षय आलासे, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी जवाहर पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी जुवेरीया गोलंदाज, तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी रमेश भुजुगडे यांची निवड झाली.

कुरुंदवाड नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी ११ वाजता विशेष सभा घेण्यात आली. नामनिर्देशन पत्रांची छाननी झाल्यानंतर दुपारी ३ वाजता सभापतींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. या निवड प्रक्रियेसाठी मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी पिठासन अधिकारी म्हणून काम पाहिले.

स्थायी समितीचे सदस्य म्हणून अक्षय आलासे, जवाहर पाटील, रमेश भुजुगडे व जुवेरीया गोलंदाज यांची निवड झाली. बांधकाम समितीवर वैभव उगळे, विमल पोमाजे, प्रदीप चव्हाण व दीपक परीट यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा समितीवर संगीता कर्णाळे, जयश्री पाटील, तानाजी आलासे व विशाल पाटील यांची निवड करण्यात आली.

स्वच्छता, आरोग्य व साफसफाई समितीवर जय कडाळे, अलका मधाळे, विजय पाटील व अलका पाटील यांचा समावेश आहे. नियोजन व विकास समितीवर जय कडाळे, वैभव उगळे, विजय पाटील व सुजाता जाधव, तर महिला व बालकल्याण समितीवर जयश्री पाटील, सुनंदा आलासे, आयेशा बागवान व रुक्सना बागवान यांची निवड झाली.

यावेळी मुख्याधिकारी मनोज देसाई, नगरसेवक शुभम जोग, बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी, अधीक्षक श्रद्धा वळवडे, शिवमाला भोसले, स्नेहल सोनाळकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT