Kolhapur ZP Elections: जागावाटपामध्ये महायुतीत संघर्ष अटळ

कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी नेत्यांचा वाढता आग्रह
ZP Panchayat samiti election
ZP Panchayat samiti election File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आणि आपल्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या या जागांसाठी धरलेला आग््राह यामुळे जागावाटपावरून महायुतीमध्ये संघर्ष अटळ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे माघारीपर्यंत महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ चालेल. त्यानंतर ‌‘मैत्रीपूर्ण‌’च्या नावाखाली एकमेकांना पाण्यात पाहण्यास सुरुवात होणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने जादा जागा पदरात पाडून घेण्यात यश मिळविले. परंतु जिल्हा परिषद, पंचायत समितीचे राजकारण वेगळे असते. ग््राामीण भागात गटातटाचे राजकारण खोलवर रुजले आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी संघटनात्मक बांधणीही चांगली केलेली असते. प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना ते नावाने ओळखत असतात. त्यामुळे तालुक्यात जो आमदार असतो, त्याचा त्या गावांवर प्रभाव असतो. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच्या सर्व दहा आमदार महायुतीचे असले तरी ते एकाच पक्षाचे नाहीत. कोल्हापूर उत्तरसह करवीर, राधानगरी-भुदरगड, शिरोळमध्ये शिंदे शिवसेनेचे, कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी, चंदगडमध्ये भाजप, कागलमध्ये अजित पवार राष्ट्रवादी आणि शाहूवाडी व हातकणंगलेमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रत्येक आमदार प्रयत्न करत असतो. त्यांच्यासाठी ते आग््राह असतात. त्यामुळे शिंदे शिवसेनेच्या किंवा अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांच्या तालुक्यात भाजपला जागा कशा मिळणार, असा सवाल आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जादा जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपला कंबर कसावी लागणार लागणार आहे. त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

चंदगड, कोल्हापूर दक्षिण आणि इचलकरंजी या तीन विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार असल्याने या तालुक्यांत भाजप अधिक जागांसाठी आग््राही राहणार आहे. विशेषतः कोल्हापूर दक्षिणमध्ये जिल्हा परिषदेचे सहा मतदारसंघ असून येथे भाजप आपला दावा सोडायला तयार नाही. इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांचा इचलकरंजी शहराला लागून हातकणंगले तालुक्यातील काही जिल्हा परिषद मतदारसंघांवर प्रभाव असल्याने त्या भागातही भाजपचे राजकारण आक्रमक राहणार आहे. उर्वरित ठिकाणी मात्र जागा मागण्यात मर्यादा येणार असल्यामुळे जागावाटपावरून महायुतीमध्ये संघर्ष अटळ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news