कोल्हापूर

कोल्हापूर: शिरोलीजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

अविनाश सुतार

शिरोली एमआयडीसी: पुढारी वृत्तसेवा : भरधाव वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. ओंकार शिवाजी पाटील (वय १७, रा. अंबरनाथ, ठाणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली गावाजवळ आज (दि.१८) सकाळी पावणे अकरा वाजता झाला.

याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, अंबरनाथ ठाणे येथील ओमकार शिवाजी पाटील हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे शिक्षणासाठी वास्तव्यास होता. तो कोडोलीत एमएससीबी फाट्याजवळ एका घरात भाड्याने राहत होता.

आज सकाळी कामानिमित्त मोपेडवरून (एम.एच.०९ ई वाय – ६१५०) तो कोडोली येथून कोल्हापूरकडे पुणे – बेंगलोर महामार्गावरुन जात होता. पुलाची शिरोली येथील महालक्ष्मी अर्थमुव्हर्स च्या समोर आला असता त्याच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात तो रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT