महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाला. 
कोल्हापूर

कोल्हापूर : अन् 'सासर'ची गौराई 'माहेरी' आलीच नाही!

डेंग्यूने घेतला दोन मुलांच्या आईचा बळी

पुढारी वृत्तसेवा

गुडाळ : गणेश चतुर्थीदिवशी माहेरी येऊन दिवसभर थांबून गौरीदिवशी येतो, असे आई व भावाला सांगून रूपाली सासरी गेल्या. दरम्यान, त्यांना अचानक तीव— अशक्तपणा आला अन् मृत्यूनेच गाठले. बळपवाडी (ता. पन्हाळा) येथील रूपाली संग्राम बळीप (वय 30) यांच्या सुखी संसाराचा रविवारी डेंग्यूने बळी घेतला. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने दोन मुलांची मायेची सावली हरपली.

रूपाली यांचा संग्रामशी 2015 मध्ये विवाह झाला. धामणी खोर्‍यातील बळपवाडी हे त्यांचे गाव. विवाहानंतर साने गुरुजी वसाहतीमधील गजलक्ष्मी पार्क येथे राहायला आले. संग्रामचे स्टेशन रोड येथे इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान आहे. शनिवारी सकाळी सर्व जण रूपालींच्या आई व भावाला भेटण्यासाठी आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथे गेले. गौरीदिवशी परत येतो, असे सांगून त्या बळपवाडीला आल्या. रविवारी सकाळपासून रूपाली यांना अशक्तपणा व तीव्र ताप जाणवू लागला. उपचार सुरू असतानाच रविवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.

रुपाली व संग्राम यांचा ९ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मोठ्या कष्टाने त्यांनी आपला संसार उभा केला होता. उच्चशिक्षित संग्रामने व्यवसायात जम बसवून कोल्हापुरात घरही बांधले होते. शनिवारी गणेश चतुर्थी दिवशी रुपाली माहेरी येऊन दिवसभर थांबून गौरीपूजन दिवशी गौरी आणायला येते, असे आईला व भावाला सांगून सासरी बळपवाडीला निघून गेली. शनिवारी (दि.७) रात्री तिला किरकोळ ताप आला. रविवारी सकाळी म्हासुर्लीत उपचार करुनही ताप कमी आला नसल्याने आणि डेंग्यूची लक्षणे जाणवल्याने रविवारी सायंकाळी रुपालीला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले. रविवारी रात्री उशिरा डेंग्यूचे निदान झाले आणि ती पहाटे कोम्यात गेली. उपचार सुरु असतानाच सोमवारी (दि.९) दुपारी तिची प्राणज्योत मावळली.

बाबा, मम्मी कुठे आहे..?

रूपाली यांना स्वरूप व ईशान अशी दोन मुले आहेत. स्वरूप साने गुरुजी वसाहत येथील एका शाळेत शिकत आहे, तर ईशान सव्वा वर्षाचा आहे. दोन्ही मुलांचे मम्मीवर जीवापाड प्रेम. रूपालींशिवाय हे दोघे राहत नव्हते. आईच्या मृत्यूने या दोन मुलांची मायेची सावली हरपली. ‘बाबा, मम्मी कुठे आहे..?’ असे म्हणून ही दोन चिमुकली हंबरडा फोडत आहेत.

असाही दैव दुर्विलास...

विशेष म्हणजे रुपाली स्वतः ५ वर्षाची व तिचा भाऊ रणजित दीड वर्षाचा असताना तिचे वडिल रंगराव हुजरे यांचा मृत्यू झाला अन् ही भावंड पितृ प्रेमाला पोरकी झाली आताही दैव दुर्विलास असा की, आता रुपाली अशीच अचानक गेल्याने ४ वर्षाचा स्वरूप व १४ महिन्याचा ईशान ही दोन चिमुकली भावंड मातृप्रेमाला पोरकी झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT