कोल्हापूर : लेसरमुळे तरुणाच्या डोळ्याचा पडदा भाजला, रक्तवाहिन्या फुटून गुठळ्या

गणेश मिरवणुकीत लेसरचा वापर; चौघांच्या डोळ्यांना दुखापत
Young man's eye seriously injured by laser
आदित्य बोडके व युवराज पाटील.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीमध्ये अनेक मंडळांनी लेसरचा वापर केला. यामुळे चार जणांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. यामधील उचगाव, मणेर मळा (ता. करवीर) येथील आदित्य पांडुरंग बोडके या 21 वर्षीय तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. त्याच्या उजव्या डोळ्याचा पडदा भाजला असून, रक्तवाहिन्या फुटून गुठळ्या तयार झाल्या आहेत. सध्या आदित्यला उजव्या डोळ्यांनी काहीच दिसत नाही. शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ त्याच्यावर उपचार करत आहेत.

दरम्यान, शनिवारी एक ज्येष्ठ नागरिक नातवाला घेऊन दवाखान्यात जात होते. तेव्हा मिरवणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या लेसरमुळे त्या दोघांच्या डोळ्याला इजा झाली आहे. साऊंड सिस्टीमच्या दणदणाटामुळे त्यांच्या तब्बल अर्धा तास कानठळ्या बसल्या होत्या. शुक्रवारी मिरवणूक बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभारलेल्या पोलिस कर्मचारी युवराज पाटील यांच्या डोळ्यालाही लेसर किरणांमुळे गंभीर इजा झाली. संबंधित कर्मचार्‍याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उचगाव परिसरातील मणेरमळा येथील एका मंडळाने गणेश आगमन मिरवणुकीत लेसर किरणांचा प्रखर आणि तीव्र विद्युतझोत वापरण्यात आला होता. मिरवणूक पाहण्यासाठी आदित्य गेला होता. या विद्युत झोताची तीव्र किरणे त्यांच्या डोळ्यांवर पडली. यानंतर त्याला अंधारी आली. उजव्या डोळ्यांनी दिसायचे बंद झाले, त्यामुळे त्वरित आदित्यने घर गाठले. वडिलांनी तत्काळ शास्त्रीनगर येथील नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांकडे त्याला नेले. त्यांच्या डोळ्याचा पडदा, बुब्बुळाला गंभीर जखम झाली असून डोळ्यातील रक्तवाहिन्या फुटून गुठळ्या झाल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news