कोल्हापूर

कोल्हापूर : भाज्यांचा दर वधारला…! घाऊक बाजारात कोथिंबीर ३० तर मेथी २५ रुपये जुडी

मोहन कारंडे

सैनिक टाकळी; पुढारी वृत्तसेवा : भाजीपाल्यांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शिरोळ तालुक्यात सैनिक टाकळी येथील शेतकरी अमोल पाटील यांनी पिकवलेल्या मेथी आणि कोथिंबीरला घाऊक बाजारात ३० रुपये कोथंबीर पेंढी आणि २५ रुपये मेथीचा दर मिळाल्याने चांगले उत्पन्न मिळत आहे. किरकोळ बाजारात सर्रास ५० रुपये पेंडीप्रमाणे मेथी व कोथिंबिरीची विक्री सुरू असल्याने भाजीपाला विक्रेताही मालामाल होत आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा अनेकदा शेतकऱ्याला शक्यतो फटकाच बसत असतो. पण यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे. अत्यंत उष्ण असणार तापमान, ऊन सावलीच्या खेळात भाजीपाल्यावर येणारी रोगराई, उगवण क्षमतेवर होणारा परिणाम यामुळे उत्पन्नात घट होत असते. तसेच अति पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीकही कुजण्याची प्रक्रिया होत असते. यामुळे शेतकरी अनेकदा नुकसानीत येत असतो. पण यावेळी सैनिक टाकळी येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला चांगल्या दराने विक्री होऊ लागल्याने लॉटरीच लागली आहे.

अनेकदा कोथंबीर एक रुपये पेंडीप्रमाणे किंवा पिकवलेल्या पिकात मशागत करण्याची वेळ येते. पण सध्या कोथंबीरीने बाजारात उच्चांकी दर गाठला असून ५० रुपये दराने विक्री सुरू आहे. तसेच मेथी देखील अनेकदा विक्रीच होत नसल्याने जनावरांचा चारा म्हणून सुद्धा वापर केला जातो. परंतु सध्या ढगाळ वातावरण, वारंवार होणारा पाऊस, त्यामुळे बाजारातील भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांचा दर वधारला आहे. त्याचबरोबर दोडका, टोमॅटो अशा भाज्याही चढ्या भावानेच विक्री होत असल्यामुळे भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‌

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT