कोल्हापूर

कोल्हापूर : धनगरमोळा येथे साडेतीन एकरातील ऊस जळून खाक

अविनाश सुतार

आजरा : पुढारी वृत्तसेवा : धनगरमोळा (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत साडेतीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. अंकुश विठ्ठल पाटील या शेतकऱ्याचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , धनगरमोळा व सुळेरान परिसरालगत नलवडे फार्म जवळ माजी सैनिक शेटगे यांचे शेत आहे. दुपारी साडे बाराच्या सुमाराला आग लागली. प्रसंगावधान साधून आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शार्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या शेतातील साडेतीन एकर क्षेत्रावर त्यांनी ऊसाची लागवड केली होती. या शेता लगत विद्युतवाहिनी गेली आहे. उसाला आग लागल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या जयसिंग पाटील यांना दिसले. त्यांनी माऊली शाळेतील शिक्षक व विद्यार्थांना माहिती दिली. विद्यार्थी व शिक्षकांनी पाणी व झाडांचे डहाळे वापरून आग विझवली.

प्रसंगावधान राखून आग विझवल्यामुळे सुमारे दहा ते पंधरा एकरवरील ऊस वाचला. अंकुश पाटील हे विनाअनुदानित शाळेत शिक्षक म्हणून काम करीत आहेत. ऊस जळाल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आजरा कारखान्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT