Kolhapur Stormy wind Rainfall
शिरोली एमआयडीसी : पुलाची शिरोलीसह परिसरात ढगांच्या गडगडाट वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडल्या , सांगली फाटा कोरगावकर पेट्रोल पंपाजवळ जांभळीचे झाड मोटरसायकलवर पडल्याने मोटरसायकलचे नुकसान झाले . पावसाच्या हजेरीने शेतकरी आनंदी झाला आहे, ज्या परिसरात तुरळक सरी पडल्या येथे उष्मा वाढण्याची शक्यता आहे.
पुलाची शिरोली, हालोंडी, परिसरात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली तर नागाव, मौजे वडगाव, हेरले परिसरात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या , रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्यासुमार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरूवात झाली वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने सांगली फाटा येथे असणाऱ्या चहा नाष्ट्याच्या टपऱ्यांच्या मागे असणारे जांभळीचे झाड टपऱ्यांसमोर उभ्या असणाऱ्या मोटरसायकलवर पडल्याने मोटरसायकलचे नुकसान झाले . या अचानक आलेल्या पावसामुळे या भागातील शेतकरी आनंदी झाला आहे. पेरणीपुर्व मशागतीला या पावसामुळे गती मिळणार आहे . तर नागाव, मौजे वडगाव, हेरले परिसरात वाऱ्यासह पावसाच्या तुरळक सरी पडल्याने परिसरात उष्मा वाढण्याची शक्यता आहे.