कबनूर; पुढारी वृत्तसेवा : कबनूर-इचलकरंजी येथील जवाहरनगर हायस्कूल मध्ये इयत्ता ८ वी च्या वर्गात शिकणारा विद्यार्थी शिवानंद तावरे हा सकाळी वृत्तपत्रे विकून शिक्षण घेत आहे. " कमवा, शिका व स्वावलंबी व्हा " या तत्वानुसार तो शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जवाहरनगर हायस्कूल मुख्याध्यापिका यु. के. पोतदार यांनी डॉ.कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त व वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून शनिवारी शाळेच्या वतीने त्याला शालेय साहित्य भेट देवून त्याचा गौरव केला. संस्थेचे अध्यक्ष जयकुमार कोले यानी त्याचे कौतुक केले. यावेळी वृत्तपत्र विक्रेते सुरेश चौगुले, जे. आर. पुरवंत, ए. एन. माने चौगुले, गाडेकर, एम. ए. नेजे उपस्थित होते.
हेही वाचा