Kolhapur Shiroli exploiting case pudhari
कोल्हापूर

Kolhapur Shiroli exploiting case: आता नादाला नाही लागणार.. शिरोलीतील अत्याचार प्रकरणातील आरोपीचा माफीनामा; वडिलांची फाशीची मागणी

Anirudha Sankpal

Kolhapur Shiroli exploiting case: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शिरोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. १५ हून अधिक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या २२ वर्षीय शाहिद सनदी या तरुणाने अखेर आपला गुन्हा मान्य करत जाहीर माफीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, आरोपीच्या वडिलांनीच आपल्या मुलाच्या कृत्याचा जाहीर निषेध करत त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

नेमके प्रकरण काय?

शिरोली ग्रामपंचायत परिसरात राहणाऱ्या शाहिद सनदी याने अनेक हिंदू तरुणींशी शारीरिक संबंध ठेवले होते. इतकेच नव्हे तर, त्याने या तरुणींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सकल हिंदू समाजाने या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आरोपीने जाहीर माफीनामा दिला आहे. "मी माझ्या मर्जीने सर्व अश्लील फोटो आणि व्हिडिओ डिलीट करत असून, इथून पुढे कोणत्याही हिंदू मुली किंवा महिलेच्या नादाला लागणार नाही नाही," असे त्याने या माफीनाम्यात म्हटले आहे.

पित्यानेच मागितली फाशी

या घटनेत सर्वात खळबळजनक बाब म्हणजे आरोपी शाहिदच्या वडिलांनी घेतलेली भूमिका. आपल्या मुलाने केलेले कृत्य अतिशय निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी गावच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. "संधी कुटुंब कधीही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही. माझ्या मुलाने संपूर्ण समाजाची मान खाली घातली आहे. पोलीस प्रशासनाने कोणताही विचार न करता त्याला थेट फाशीची शिक्षा द्यावी, आमचा त्याला कोणताही विरोध असणार नाही," अशा शब्दांत वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गावकरी आणि प्रशासनाकडे साकडे

आरोपीच्या वडिलांनी शिरोली ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की, जो काही न्याय दिला जाईल तो आम्हाला मान्य असेल. मुलाच्या या कृत्यामुळे सनदी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला जाऊ नये, अशीही सुप्त भावना ग्रामस्थांमध्ये उमटत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, पीडित मुलींच्या तक्रारीनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT