Monika Elephant  Pudhari
कोल्हापूर

Monika Elephant | उदगावच्या ’मोनिका हत्तीणी’वर वनताराकडून उपचार सुरू; डाव्या पायात फ्रॅक्चर, उजव्या पायालाही दुखापत

उदगाव (ता. शिरोळ) येथील कुंजवन जैन मंदिर ट्रस्टची हत्तीण

पुढारी वृत्तसेवा

Monika Elephant Vantara Treatment

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील श्री ब्रह्मनाथ पुरातन दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट कुंजवन येथील मोनिका हत्तीणीच्या मागील डाव्या पायात फ्रॅक्चर आणि उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या हत्तीणीवर उपचार करण्यासाठी गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील 'वनतारा'चे सहा सदस्यीय तज्ज्ञ वैद्यकीय पथक उदगाव येथे उपचारासाठी २४ तास वैद्यकीय सेवेसाठी तळ ठोकून आहेत. सध्या मोनिकावर हायड्रो थेरपी यासह विविध उपचार सुरू आहेत.

उदगाव येथील श्री ब्रह्मनाथ पुरातन दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट (कुंजवन) येथे २०१० सालापासून मोनिका हत्तीण आहे. ट्रस्टकडून मोनिका हत्तीणीची अत्यंत काळजीपूर्वक तिची देखभाल केली आहे. शिवाय उदगाव, जयसिंगपूर या परिसरात मोनिका हत्तीणीची मोठी लोकप्रियता असून धार्मिक कार्यातही तिला महत्त्वाचे स्थान आहे.

दरम्यान, मोनिका हत्तीणीचा १ ऑक्टोबर रोजी पाय दुखावल्याचे लक्षात आले. त्यानंतर पायाची सुज वाढत गेली. त्याचबरोबर हत्ती बसल्यानंतर तिला उठता येत नव्हते. डावा पाय दुखावल्यामुळे उजव्या पायावर बोजा पडल्याने उजवा पाय ही दुखावल्याचे समोर आले. त्यानंतर पायांची सुज वाढत गेली होती.

२६ ऑक्टोबरला वनताराच्या टीमला पाचारण केल्यानंतर २७ ऑक्टोबरला वनताराची वैद्यकीय टीम दाखल झाली आहे. पाय दुखावल्यामुळे पायावरचे वजन कमी करण्यासाठी तिला पाण्यातील हायड्रो थेरपी सुरू करण्यात आली आहे. त्याबरोबर वनताराच्या सुचनेनुसार कॅल्शियमयुक्त (ऊस, गवत, फळे, खिचडी अन्य) आहार सुरू आहे.

मोनिकावर कर्नाटकातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. सध्या वनताराच्या वैद्यकीय टीमकडून कॅल्शियमयुक्त आहार, वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सध्या हायड्रो थेरपी सुरू असून मोनिका हत्तीणीचा प्रतिसाद मिळत आहे.
-संजय चौगुले, अध्यक्ष, श्री ब्रह्मनाथ पुरातन जैन मंदिर ट्रस्ट (कुंजवन), उदगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT