आंबर्डे (ता. शाहुवाडी) येथे ताब्यात घेण्यात आलेला आरोपी उत्तम खोत सोबत मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम व वन कर्मचारी  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Crime | शाहूवाडी तालुक्यात वनविभागाच्या नावाखाली पैसे उकळणारा तोतया जेरबंद

आंबर्डे येथील घटना; नागरिकांनी रंगेहात पकडून वनविभागाच्या केले स्वाधीन

पुढारी वृत्तसेवा

Shahuwadi Fake Forest Officer

विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे येथे वनविभागाची भीती दाखवून ग्रामस्थांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका तोतयाला नागरिकांनी रंगेहात पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले आहे. उत्तम खंडू खोत (रा. परखंदळे, ता. शाहूवाडी) असे या संशयिताचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

संशयित उत्तम खोत याने आंबर्डे येथील काही नागरिकांच्या घरांची तपासणी केली. "तुम्ही जंगलातून बेकायदेशीर लाकूड आणले असून, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी पैशांची मागणी केली आहे," अशी भीती त्याने नागरिकांना दाखवली. तो घरगुती लाकूडतोडीच्या नावाखाली मोठ्या रकमेची मागणी करत होता. मात्र, त्याचा संशयास्पद वावर पाहून सतर्क ग्रामस्थांनी त्याला जाळ्यात पकडले आणि थेट वनविभागाच्या ताब्यात दिले.

​ग्रामस्थांच्या या सतर्कतेमुळे वनविभागाच्या नावाखाली चालणाऱ्या वसुलीचा पर्दाफाश झाला असून, ग्रामस्थांच्या जागरूकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. वनविभाग आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

वनविभागाचा कोणताही कर्मचारी अशा प्रकारे नागरिकांकडून पैशांची मागणी करत नाही. ग्रामीण भागातील जनतेने अशा तोतयांना बळी पडू नये. गावात असा कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.
— उज्ज्वला मगदूम (वनपरिक्षेत्राधिकारी, मलकापूर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT