कागल : कागल नगरपालिकेच्या सफाई कर्मचारी कविता पिंटू आवळे यांचा उपचारादरम्यान मध्यरात्री मृत्यू झाला. त्यांना नगरपालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत.
प्रायव्हेट फंड आणि इतर सोयीसुविधा दिल्या नसल्याच्या निषेधार्थ सफाई कर्मचाऱ्यांनी आपले सर्व कामकाज बंद करून मृतदेहासह पालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. नगरपालिकेच्या दारात मृतदेह ठेवण्यात आले आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही असा पवित्रा घेतला.
कविता आवळे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, सफाई कर्मचाऱ्यांच्या फंडासह इतर सोयी सुविधा तात्काळ देण्यात यावा, त्याची कार्यवाही करण्यात यावी यासाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून दुपारी साडेअकरा वाजल्यानंतर देखील आंदोलन सुरूच होते
नगराध्यक्ष सविता मने मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी सकाळी प्रेत दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना विनंती केली. मात्र आक्रमक झालेले कर्मचाऱ्यांनी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका घेतली. नगरपालिकेच्या दारातच त्यांनी आंदोलन सुरू केले. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत आजच निर्णय घेण्यात यावा, अशी देखील त्यांनी भूमिका घेतली.
मुख्याधिकारी आणि भैया माने यांनी मध्यस्थ करून निर्णय तात्काळ निर्णय घेण्याची आश्वासन दिले , मात्र लेखी आश्वासन द्यावे असे स्पष्ट केले त्यानंतर दुपारी पालिकेची सर्वसाधारण सभा तातडीने बोलावून आपल्या मागण्या सभेमध्ये मान्य केल्या जातील, अशा आश्वासन दिले. सफाई कर्मचाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन देखील दिले.