नृसिंहवाडी, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र स्टेट पॅरा स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील सई मोरेश्वर पुजारी हिने 100 मीटर फ्रीस्टाइल, 100 मीटर बॅकस्ट्रोक आणि 50 मीटर बटरफ्लाय या वेगवेगळ्या तीन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. तिचे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया गांधीनगर (गुजरात) येथे सिलेक्शन झाले आहे. (Sai Pujari)
तिला प्रशिक्षक मानसिंग पाटील, अमर पाटील, अकुंश पाटील, संतोष डोकरे, रिना दास, वडील मोरेश्वर पुजारी, आई केतकी पुजारी यांचे मार्गदर्शन मिळाले. सई पुजारी हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिने मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत यापूर्वी यश प्राप्त केले आहे. सई पुजारी ही कोल्हापूर येथून स्पर्धेत भाग घेत असली तरी ती मुळची नृसिंह वाडी येथील रहिवासी आहे. (Sai Pujari)
हेही वाचा