कोल्हापूर

कोल्हापूर : तेवीस दिवसात भरले राधानगरी धरण

Shambhuraj Pachindre

लांबलेला पाऊस,धरणामध्ये घटत चाललेला पाणीसाठा यामुळे पाणीबाणी होतेय की काय? याची चिंता कोल्हापुरवासीयांना लागली असतानाच उशीरा का असेना पावसाचे आगमन झाले, आणी अवघ्या तेवीस दिवसामध्ये राधानगरी धरण पुर्णत: भरले. आणी पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली.

जुनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावणार्या पावसाने दडी मारली.धरणामध्ये असणारे उरले सुरले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले,पाण्याअभावी पिके धोक्यात आली.परंतु उशिरा का असेना हजेरी लाऊन गैरहजेरीचा वजावटा काढला. दि. ४ जुलैला राधानगरी धरणामध्ये सव्वादोन टी.एम.सी.पाणीसाठा होता. व  आजपर्यत धरणक्षेत्रामध्ये ४८२ मि.मी.पावसाची नोंद झाली.

परंतु गेल्या दहा-बारा दिवसात पावसाने संततधार सुरु ठेवल्याने राधानगरी धरण अवघ्या तेवीस दिवसात भरुन वाहु लागले. तर काळम्मावाडी धरणामध्ये दि.४ जुलै रोजी १.८५ टी.एम.सी.पाणीसाठा होता व त्यादिवशी अखेर ३५७ मि.मी.पावसाची नोंद झाली होती. पण आज या धरणामध्ये १५.३८ टी.एम.सी.पाणीसाठा असुन आज अखेर १२१५ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तसेच तुळशी धरणामध्ये  ०.८५ टी.एम.सी.पाणीसाठा होता. तर त्यादिवशीपर्यत १९४ मि.मी.पावसाची नोंद झाली होती. पण आता याच धरणामध्ये १.९६ टी.एम.सी. पाणीसाठा असुन आज अखेर १७०२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.

प्रामुख्याने पावसाने जरी उशिरा हजेरी लावली असली तरी राधानगरी धरणक्षेत्रामध्ये गतवर्षीइतक्या सरासरीने पाऊस झाला.मात्र काळम्मावाडी आणी तुळशी धरणक्षेत्रामध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमीच पाऊस झाला आहे.पण राधानगरी धरण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा विषय संपला आहे.

२४ जुनची पाणीसाठा स्थिती…

  • कंसात त्यादिवशी अखेरचा पाऊस मि.मी.मध्ये
  • राधानगरी धरण १.५७ टी.एम.सी.(११०)
  • तुळशी ०.८४ टी.एम.सी(१२)
  • काळम्मावाडी १.१७ टी.एम.सी.(६३)

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT