कोल्हापूर : पुलाची शिरोली येथे टोळक्याने पूर्ववैमनस्यातून दाम्पत्यासह मुलावर एडक्याने हल्ला केला. यामध्ये दोघे जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पुलाची शिरोली येथील दिगंबर रघुनाथ कांबळे (वय 40), आरती कांबळे (35) व मुलगा वल्लभ कांबळे (11) हे सर्व जण जेवणानंतर फिरायला गेले असता दबा धरून बसलेल्या टोळक्याने हा हल्ला केला. या हल्ल्यात दिगंबर व आरती जखमी झाल्या आहेत, तर त्यांचा मुलगा वल्लभ हा थोडक्यात बचावला आहे. हा हल्ला वैभव बेडेकर (वय 25, रा. लालबहादूर हौसिंग सोसायटी) याने केला. या हल्ल्यात दिगंबर यांच्या हाताचे बोट तुटले असल्याचे समजते.