शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : भुये (ता.करवीर ) येथील ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवत श्री हनुमान ग्रामविकास पॅनेलने सरपंच पदासह पाच जागेवर विजय मिळवला. तर सत्ताधारी आघाडीला चार जागांवर समाधान मानावे लागले.
भुये ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी उपसरपंच भारत पाटील- भुयेकर, प्रदिप पाटील-भुयेकर ,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विक्रम पाटील यांनी श्री हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातुन लोकनियुक्त सरपंच पदासाठी पंचायत समिती सदस्या मालिनी पाटील- भुयेकर यांच्या सह नवीन चेहऱ्यांना संधी देत माजी जि.प.सदस्य अमर नाईक,माजी सरपंच अभिजीत पाटील यांच्या सत्ताधारी आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले होते.
अटीतटीच्या लढतीत मालिनी पाटील – भुयेकर यांनी सविता पाटील यांचा ४७ मतांनी पराभव करून सरपंच पदावर नाव कोरले. तर पाच सदस्य निवडून आल्याने सत्तांतर झाले.
मेघा शिंदे(३३८), संगिता पाटील (३४२),आश्लेश खाडे (३५२), कुलदीप पाटील (३४४), साक्षी पाटील (३४३) विरोधी राजर्षी
अभिजीत बाबासाहेब पाटील (३३६), कृष्णात चौगले (३७१), विमल पाटील,(३७८), प्रेमला शिंदे (३७८)
.हेही वाचा