Panchganga River, Rain Update
पंचगंगा इशारा पातळीकडे  File Photo
कोल्हापूर

Kolhapur | पंचगंगा नदी पुन्हा इशारा पातळीच्या दिशेने

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरात पावसाची संततधार सुरूच असून आज (दि. २०) सकाळपासून पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सध्या पाणाची पातळी (सकाळी ११.४५) ३५.११ फुटावर आहे. हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर केला आहे. (Kolhapur)

Kolhapur | जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

  • हवामान खात्याचा कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर.

  • पंचगंगा पाण्याची पातळी ३५.१० फुट.

  • जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली गेले.

आज जिल्ह्याला येलो अलर्ट

राज्यात विविध ठिकाणी पाऊस सुरुच आहे. कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याने आज (दि.२०) येलो अलर्ट जाहीर केला आहे. आज सकाळपासून जिल्ह्यासह परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे. गुरुवारी (दि.१८) सायंकाळी ५ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी २५ फूट इतकी होती. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता पाणीपातळी ३३ फूट ६ इंचावर होती तर सायंकाळी नदीचे पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आले. माहितीनुसार शुक्रवारी रात्री ९ वाजता जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली गेले होते.

आज सकाळी ११ च्या सुमारास पंचगंगा पाण्याची पातळी ३५.१० फुटावर आहे.

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ७ फुटांची वाढ

धरण व पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र होत असलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या चार नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी रात्रीपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 7 फुटांची वाढ झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील राजापूर बंधार्‍यातून 54 हजार क्युुसेकने पाणी कर्नाटकात सोडले जात आहे, तर ‘अलमट्टी’त 98.416 टीएमसी पाणीसाठा होऊन 65 हजार क्युसेक विसर्ग केला जात आहे.

येलो अलर्ट म्हणजे काय?

यलो अलर्ट (Yellow Alert) देशाच्या बहुतांश भागात मान्सून पाऊस जोरात सुरु आहे. काही राज्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD-India Meteorological Department) राज्यात काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी यलो अलर्ट सांगितला आहे. अलर्ट सांगितला आहे पण नेमका कमी, अधिक, रिमझिम, जोरदार, मुसळधार, अतिमुसळधार, की ढगफूटी नेमका कसा, हे कसं कळणार. यासाठी पावसाच्या स्थितीनुसार भारतीय हवामान विभाग लोकांना सतर्क करत असते. जेणेकरून नागरिक सतर्क राहतील आणि संभाव्य धोके कमी होतील. जीवीत आणि वित्त हानी होणार नाही. यलो अलर्ट ही पावसाच्या खतऱ्याची पहिली घंटा असते. थोडक्यात सावधगिरीचा इशारा नागरिकांना देण्यासाठी ज्या भागात काही वेळाने आपत्ती येण्याची शक्यता असेल तर हवामान विभाग यलो अलर्ट (Yellow Alert) देते.

जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमानची आकडेवारी

कोल्हापूर जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमानची आकडेवारी मिलीमीटरमध्ये (दि.२०)

  • कागल =19

  • हातकणंगले-25

  • गडहिंग्लज -20

  • आजरा-72

  • शाहूवाडी-88

  • गगनबावडा-74

  • चंदगड-104

SCROLL FOR NEXT