Paleshwar Dam Overflow
शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर लघु मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाला.  Pudhari News Network
कोल्हापूर

कोल्हापूर : पालेश्वर धरण ओव्हर फ्लो, धबधबा कोसळू लागला

पुढारी वृत्तसेवा

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर लघु मध्यम प्रकल्प बुधवारी (दि ३) रोजी ओव्हर फ्लो झाला. पालेश्वर धबधबा कोसळू लागल्याने पर्यटकांनी स्वतः बरोबर इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. कडवी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत ५५ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली.

कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता २.५१ टीएमसी

पालेश्वर धरणाची पाणी साठवण क्षमता ८.७९ दलघमी इतकी आहे. कासारी खोऱ्यात पावसाचा जोर वाढल्याने पाण्यासाठ्यात वाढ होऊन सांडव्यातून पाणी अखेर प्रवाहित होऊन  बुधवारी धरण ओव्हर फ्लो झाले. सांडव्यातून पाणी प्रवाहित झाल्याने पालेश्वर धबधबा कोसळू लागला आहे. पर्यटकांची येथे गर्दी वाढू लागली आहे. कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता २.५१ टीएमसी इतकी असून धरण ५३ टक्के भरले आहे.

धरण १.३३ टीएमसी भरले

धरणाची पाणीपातळी ५९३.१० मी असून उपयुक्त पाणीसाठा ३७.६७ दलघमी इतका आहे. धरण १.३३ टीएमसी भरले आहे. ३९ दलघमी पाणीसाठ्यात वाढ झाली असून गत २४ तासांत ५५ मिमी पाऊस बरसला. १ जूनपासून आजअखेर ६८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवशी ४०७ मिमी पाऊस झाला होता. धरण गतवर्षी ३ जुलैला ३३ टक्के भरले होते. धरणातून कडवी नदीपात्रात प्रतिसेकंद १५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पालेश्वर धरण ओव्हर फ्लो झाल्याने येथील धबधबा कोसळू लागला आहे. गतवर्षी पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे येथे एका पर्यटकाला जीव गमवावा लागला होता. असे प्रकार घडू नये म्हणून पर्यटकांनी सावधानता बाळगावी. पर्यटकांनी प्रवाहाजवळ जाण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये. शाळी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे.               - खंडेराव गाडे, शाखा अभियंता, कडवी
SCROLL FOR NEXT